नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त मुलांनी भरवला आठवडी बाजार

नाझरा(वार्ताहर):-नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये काल गुरुवार दिनांक 29 डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त आयोजित करण्यात आठवडी बाजाराचे उद्घाटन उपस्थित मान्यवर सौ. दिपाली देशमुख (सरपंच ,नाझरे ग्रामपंचायत) , श्री. दिनेश बाबर (ग्रामपंचायत सदस्य, चोपडी.) सौ. सुमित्रा लोहार ( ग्रामपंचायत सदस्य, नाझरे .) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंग्लिश मेडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ .सिमरन काझी मॅडम, नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे पर्यवेक्षक श्री मधुकर धायगुडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या आठवडी बाजारामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या आठवडी बाजारामध्ये मुलांनी फळभाज्या , पालेभाज्या , खाद्यपदार्थ स्टेशनरी साहित्याची विक्री केली.यामधून विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचे व्यवहार ज्ञान मिळाले. पालकांनीही या आठवडी बाजारामध्ये सहभागी होऊन मुलांचा उत्साह वाढवला.सदर कार्यक्रमाचे आभार सौ. सरगर मॅडम यांनी मांडले .तर सूत्रसंचालन सौ .पल्लवी शिंदे मॅडम यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी इंग्लिश मेडीयम मधील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.