इनरव्हील क्लब सांगोला यांच्यातर्फे तीन दिवसीय मोफत योग शिबिर संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) :-इनरव्हील क्लब सांगोला यांच्या वतीने तीन दिवसीय मोफत योगा शिबिर घेण्यात आले. हे शिबिर एखतपुर रोड शिक्षक कॉलनी येथे घेण्यात आले. या शिबिरासाठी योगशिक्षिका सौ मंगल लाटणे म्हणून लाभल्या .हे शिबिर 14 ते 16 जुलै तीन दिवस संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत घेण्यात आले .
शिबिरामध्ये 20 ते 22 महिलांनी भाग घेतला या शिबिरामध्ये योगा प्रशिक्षण ,असणाबद्दलची माहिती, आहाराबद्दलची माहिती देण्यात आली. या शिबिरासाठी क्लब अध्यक्ष सौ सविता लाटणे, माधुरी गुळमिरे यांनी तीन दिवस शिबिराचे नियोजन केले. इनर व्हील क्लब सदस्य सौ अश्विनी कांबळे, स्वाती अंकलगी , अंकिता आणेकर, संगीता चौगुले, शबनम शेख यांनी आपला सहभाग नोंदविला. सर्व महिलांचा प्रतिसाद खूप छान होता. शेवटी उपाध्यक्ष स्वाती अंकलकी यांनी सर्वांचे आभार मानून शिबिराची सांगता करण्यात आली.