गुरुवर्य बापूसाहेब झपके जयंतीनिमित्त सांगोला विद्यामंदिर येथे प्रतिमापूजन

सांगोला ( प्रतिनिधी) देशासाठी जीवन समर्पित करणारे, संस्कारसंपन्न शिक्षणाचा आग्रह धरणारे, उपेक्षितांच्या सेवेतच ईश्वर पूजा मानणारे थोर स्वातंत्र्यसेनानी, शिक्षण महर्षी, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संस्थापक अध्यक्ष प.पू.कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके यांचा प्रवास स्वातंत्र्य चळवळीचा आहे, मूल्यप्रेमाचा आहे, रचनात्मक कार्याचा आहे. त्याचबरोबर व्यक्तीच्या सर्वांगीण अभ्युदयासाठी, विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांचा विकास करण्यासाठी, राष्ट्राची चौफेर प्रगती साधण्यासाठी आणि भविष्याला आकार देणारी संस्कार संपन्न व कर्तव्यनिष्ठ पिढी सांगोला विद्यामंदिरच्या रूपाने निर्माण करणारा आहे. त्यांचे अमोघ कार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे.
२१ जुलै गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या जयंतीनिमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ,सांगोला सचिव म.शं. घोंगडे यांचे हस्ते कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण केला.
यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते उपप्राचार्य शाहिदा सय्यद पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने,ज्युनि.कॉलेज उत्सव विभाग प्रमुख प्रा.धनाजी चव्हाण यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.