सांगोला तालुका

सरकारने केलेली दुध दर वाढ  फसवी-डॉ.भाई बाबासाहेब देशमुख

सांगोला(प्रतिनिधी):-सरकारने लवकरात लवकर नियमांच्या जोखडातुन दुध व्यवसायीकांना बाहेर काढुन खर्चाच्या आधारावर ती गायीच्या दुधाला 40/-रुपये प्रती लिटर दर द्यावा…व तुमच्या फॅटचा …कमीशन कमी करण्याचा जो प्रकार आहे तो ताबडतोब बंद करावा…तुमचे दुध दरवाढीचे जे फसवे गाजर आहे ना..ते सर्वांच्या लक्षात आले आहे. येणार्‍या काळात दुध दरवाढीसाठी शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना व पशुपालकांना न्याय देण्यासाठी रस्तावर उतरण्याचा इशारा पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी दिला.

दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी  युवक संघटनेच्या वतीने पशुपालक- शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. राज्यांमध्ये सुध्दा अनेक संघटनांनी दुध दरवाढीसाठी वेगवेगळ्या भागांमध्ये आंदोलने केली.त्याची दखल घेऊन राज्य सरकारने दुधदरवाढ करण्यासाठी  एक समिती गठीत केली.व त्या समितीचा अहवाल आला असेल म्हणूनच राज्यसरकारने दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.दुध दरवाढ होणार म्हटल्यावर पशुपालक -शेतकरी आनंदात होता परंतु ही दुध दर वाढ फसवी असल्याने सर्वांच्या आनंदावर पाणी फिरले आहे…

सध्या 3.5/8.5 फॅट असलेल्या दुधाला 32/-रुपये दर मिळत आहे..तो दर वाढवुन 34/-रुपये करण्यात आला आहे…परंतु खरी मेख तर पुढे आहे..एकतर 1पाँईट फॅट कमी लागली तर 20 पैसे कमी व्हायचे म्हणजे लिटरला 1/-रुपया कमी व्हायचा आता नवीनच शक्कल लढवली आहे..1पाँईंट फॅट कमी लागली तर 1/-रुपया कमी होणार आहे.. म्हणजे लिटरला 5/-रुपये कमी होणार आहेत…तसेच वाहतुक व कमिशन 2/-रुपये होते ते 1-50/-पैसे कमी करण्यात आले आहे..

एकतर पाऊसाचा लहरी पणा ..पिके नाहीशी झाली आहेत..व कसाबसा शेतकरी दुध व्यवसायाकडे वळाला असताना पुंन्हा दुधाची दर वाढ नियोजन पध्दतीने रोखुन  पशुपालक शेतकर्‍यांना आर्थिक अडचणीत आणण्याचे काम सरकारने केले असल्याचे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!