प्रकल्प संचालक आत्मा(कृषी ) यांच्या वतीने दि. 14 ऑगस्ट 2024 रोजी रानभाजी मोहोत्सव साजरा करण्यात येत आहे. रानभाज्यांचे महत्व प्रसारित करण्याकरीता व विपणन साखळी निर्माण करणे करीता सन 2020-21 पासून दर वर्षी रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात येतो.
सन 2024-25 या वर्षी हा महोत्सव क्रांती दिनाचे निमित्ताने दि. 09 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये सप्ताह स्वरूपात राबविणेत येत असून, शेत शिवारातील रानभाज्याचे आरोग्य विषयक महत्व सर्वसामान्य नागरीकांना माहित होण्यासाठी व उत्पादक ते ग्राहक अशी विक्री साखळी व्यवस्था बळकट करण्यासाठी दि.14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. सोलापूर येथील डॉ. निर्मल कुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात करण्यात आला आहे. या महोत्सवाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आरोग्यदायी राजभाज्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आत्मा व कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.