केंद्र शासनाच्या गृह मंत्रलयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजा करीता प्लास्टिकच्या वापरास मान्यता नाही. त्यामुळे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजनिर्मितीस व विक्रिस मान्यता नाही. तसेच राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी फेकून देवू नयेत. राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळून आल्यास ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करणे आवश्यक असते. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्ह व नांवे ( अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम, 1971 तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनतेस 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या समारंभ निमित्ताने शुभेच्छासह ध्वज संहितेच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी केले आहे.