सांगोला महाविद्यालयामध्ये सोमवार दि. 12 ऑगस्ट रोजी ‘ ग्रंथपाल दिन ’ साजरा करण्यात आला. ग्रंथालय शास्त्राचे पितामह स्व.डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा जन्म दिवस सर्वत्र ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते स्व. डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्व. डॉ. एस.आर.रंगनाथन यांनी ग्रंथालय चळवळ आणि माहितीशास्त्र यासाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. त्यांचे कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा यासाठी या महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी ग्रंथालयाचे व वाचनाचे महत्व् विदयार्थ्यांना सांगितले. तसेच ग्रंथपाल प्रा.नरेंद्र पाटील यांनी स्व. डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या विषयी मनोगत व्यक्त् केले. तसेच ग्रंथप्रदर्शनास संस्था सदस्य् मा.श्री.सुरेश फुले यांनी भेट दिली. या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.आर.डी.महिमकर, डॉ. बबन गायकवाड, प्रा. वासुदेव वलेकर, डॉ.पी.एस.पाटील, डॉ. पी.ए.बनसोडे, डॉ. अमोल पवार, श्री. विलास माने श्री.अवूधत कुलकर्णी व श्री.शंकर माने यांचेसह व इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.