माजी प्राचार्य सदाशिव आदट यांचे निधन

नाझरे ता. सांगोला येथील माजी प्राचार्य सदाशिव रामचंद्र आदट यांचे शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी रात्र साडेबारा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 74 होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता बेलवण नदी माळे वाडी नाझरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.