सांगोला विद्यामंदिरमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..

सांगोला (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक बिभीषण माने उपस्थित होते.
यानिमित्ताने उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.धनाजी चव्हाण म्हणाले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे युगप्रवर्तक तत्वज्ञ म्हणून विश्वविख्यात आहेत.त्यांचा विविध ज्ञानशाखांचा व्यासंग, सामाजिक विषमता काढण्यासाठीचे कृतिशील कार्य, समग्र राजकीय कारकीर्दीत जपलेली कमालीची नैतिकता, पत्रकारितेतून दिलेली विचारधारा,शिक्षण संदर्भातील मूल्यगर्भ विचार व त्यांचे अमोघ कर्तृत्व हे क्रांतीदर्शी असून प्रत्येकाला स्वयंप्रकाशित होण्यासाठी प्रेरणा देणारे आहेत विद्यार्थ्यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचा, कार्याचा आदर्श समोर ठेवत भविष्यातील जबाबदार व समंजस नागरिक बनण्याचा प्रमाणिक प्रयत्न करावा. त्यातूनच स्वतःचा विकास, राष्ट्राची प्रगती आणि समाजाचा अभ्युदय होईल.
या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते