उत्कर्ष विद्यालयाची संस्कृत विषयाकडे यशस्वी वाटचाल .

संस्कृत भारती द्वारा पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित संस्कृत सुभाषित स्पर्धा अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धा हरीभाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे 28/ 11/ 2022 रोजी संपन्न झाली होती. सदर स्पर्धा तीन गटांमध्ये झाली, यामध्ये जिल्ह्यातील 15 शाळांमधील एकुण 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
संस्कृत भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे ,इंग्रजी मराठी हिंदी याबरोबरच संस्कृत विषयाची आवड निर्माण व्हावी व संस्कृत पाठांतराच्या उच्चाराचे फायदे विद्यार्थ्यांना व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा प्रथम शालेयस्तरावर व नंतर जिल्हास्तरावर आयोजित केलेली होती या स्पर्धेत उत्कर्ष विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन करून विद्यालयाच्या यशाचा आलेख चढता केला .
इयत्ता तिसरी ते चौथी या गटामध्ये कु. निसर्ग फुले यांनी प्रथम क्रमांक मिळवला ,चि .प्रेम हागरे याने द्वितीय क्रमांक तर ज्ञानदा जांगळे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटामध्ये कु. वैदेही देशपांडे- द्वितीय क्रमांक व चि. ओम पडळकर याने तृतीय क्रमांक प्राप्त केला तर इयत्ता आठवी ते दहावी गटांमध्ये कु. स्वरश्री देशपांडे हिने- प्रथम क्रमांक प्राप्त केला.सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मा.संजीवनी ताई केळकर सर्व संस्थेचे मान्यवर पदाधिकारी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विश्रांती ताई बनसोडे.,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक- श्री. सुनील कुलकर्णी सर ,उपमुख्याध्यापिका स्वरालीताई कुलकर्णी ,माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक – श्री. मिसाळ सर तसेच सर्व शिक्षक वृंदांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत विभाग प्रमुख- रेखा भिंगार्डे व शुभांगी कवठेकर यांचे मार्गदर्शन लाभले.