सांगोला:- सांगोला तालुका कृषी विभागाच्या वतीने आदिवासी दिन, ऑगस्ट क्रांती दिन व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सांगोला आठवडी बाजार तळावर रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला .रानभाज्यांची विषयी जागृती व्हावी त्यांची आहारातील महत्त्व सर्वसामान्य लोकांना माहित व्हावे यासाठी रानभाजी महोत्सव प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो.
अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या पावसाच्या पहिल्या सरीवर उगवतात अशा तांदूळजा,घोळ, शेवगा, टाकळा ,पाथरी ,पातुर, आळू केना ,पानांचा ओवा, कुरडू आघाडा ,काटेमाट, चिघळ भाजी ,अंबाडी ,पिंपळ, उंबर ,रानभेंडी ,उंबर, कपाळ फोडी ,अंबाडी, कर्टोल वीस ते पंचवीस प्रकारच्या आधी रानभाज्या या महोत्सवात मांडण्यात आल्या होत्या. रानभाजी महोत्सवाचे तहसिलदार संतोष कणसे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले .
यावेळी बोलताना तहसीलदार श्री संतोष कणसे यांनी रानभाज्या विषयी व शहरी लोकांमध्ये याचे जनजागृती होऊन जास्तीत जास्त याचा आहारात वापर होण्याविषयी काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी रानभाज्या मध्ये शरीराला पोषक असे औषधी गुणधर्म असून रानभाज्यातून मिळणाऱ्या प्रथिनातून लहान बालकाचे कुपोषणाचे प्रमाण कमी केले जाऊ शकते बालकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या रानभाज्या उपयुक्त असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. महोत्सवाच्या प्रास्तविकामध्ये तालुका कृषी अधिकारी श्री शिवाजी शिंदे यांनी कृषी विभागाच्या वतीने आयोजित केल्या जाणारा रानभाजी महोत्सव याचे महत्त्व विशद केले .
कार्यक्रमासाठी युवा नेते सागरदादा पाटील, नायब तहसीलदार श्री. साळुंखे , पंचायत समिती कृषी विभागाच्या कृषी अधिकारी सौ शेंडे .सौ. पवार . पशुधन विकास अधिकारी डॉ. गव्हाणे तसेच प्रगतशील शेतकरी श्री अनिरुद्ध पुजारी श्री संजय दिघे आदि शेतकरी व नागरिक व कृषि विभागाचा स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उत्कर्ष चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक श्री श्रीधर शेजवळ यांनी मानले .