सांगोला : फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च पॉलिटेक्निक,मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागांतर्गत “डिप्लोमा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ऑटोमोबाईल उद्योगातील करिअरच्या संधी” विषयावर एक्स्पर्ट लेक्चर आयोजन करण्यात आले होते.
या विषयावर लेक्चर देण्यासाठी फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च पॉलिटेक्निक चे माजी विद्यार्थी आणि मंगळवेढा येथील विठाई ऑटो उद्योगाचे संस्थापक श्री. शहाजी इंगोले हे उपस्थित होते.यावेळी बोलताना श्री. शहाजी इंगोले म्हणाले कि, डिप्लोमा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ऑटोमोबाईल उद्योगातील करिअरच्या संधी खूप आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न जाता स्वताःचा उद्योग व्यवसाय सुरु करावा. तसेच त्यांनी उद्योजक कसे बनावे ,इंडस्ट्री कशी चालू करावी , याविषयी सखोल माहिती दिली.
हे एक्स्पर्ट लेक्चर फॅबटेक चे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा.भावना मेनकर ,प्रा.अजयकुमार भोसले, प्रा.अरुण लोखंडे,प्रा.तन्मय ठोंबरे, प्रा.श्रीकांत बुरुंगले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या एक्स्पर्ट लेक्चरसाठी मेकॉनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.