फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे, संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेजमधे समतोल आहाराचे महत्व विषयासंबंधित सेमिनार ठेवण्यात आला.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, तसेच शरीरासाठी कोणत्या पद्धतीचा आहार किती प्रमाणात महत्त्वाचा आहे, हे सांगण्यासाठी इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी डॉ. सचिन लिगाडे हे लाभले. सर्वप्रथम शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील यांनी डॉ.सचिन लिगाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आहार म्हणजे काय? संतुलित आहार म्हणजे काय? जेवण म्हणजेच आहार का? बॅलन्स डाएट म्हणजे नेमके काय करायचे? आहार घेताना कसा आणि कोणत्या पद्धतीचा घ्यावयाचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. आहार घेताना सर्वप्रथम पालेभाज्या, फळभाज्या खाव्यात. कडधान्यांचाही आहारात समावेश करावा. खाण्याच्या पद्धतीमध्ये रोज वेगवेगळेपणा हवा, यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. आळस घालवण्यासाठी चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक आपण घेतो, परंतु ते आपल्या शरीरासाठी किती घातक ठरतात हेही विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितले.
रोजच्या जीवनामध्ये व्यायाम आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर मैदानी खेळ विद्यार्थ्यांनी खेळलेच पाहिजे, तसेच डी जीवनसत्व मिळण्यासाठी सूर्यकिरणांच्या सानिध्यात राहण्याचा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला. आहारासोबतच मानवी जीवनात झोपेलाही महत्त्व द्यावे, तसेच आहार घेताना प्रत्येक आहारातून आपल्या शरीरामध्ये 50% प्रोटीन गेले पाहिजे, हा विचार ठेवूनच आहाराचे नियोजन आपण आपल्या जीवनामध्ये करावे हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ.कोमल पवार यांनी मानले.
शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील, ए.ओ.वर्षा कोळेकर, सुपरवायझर वनिता बाबर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी फॅबटेक संस्थेचे चेअरमन माननीय श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे यांचे मार्गदर्शन लाभले.