हर घर तिरंगा मोहिमेंतर्गंत आमदार शहाजीबापू पाटील यांना ध्वज भेट
हर घर तिरंगा या मोहिमेत “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत लोकांना तिरंगा ध्वज घरी आणण्यासाठी आणि आपलया देशाच्या स्वातंत्र्याचे राष्ट्रीय प्रतिक म्हणून ते आपल्या घरावर फडकविण्यासाठी प्रोत्साहित करुन जागरुकता वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.याचाच भाग म्हणून भारतीय डाक विभागाच्या पंढरपूर डाक विभाग अंतर्गत आदरणीय डाक अधिक्षक श्री भोर साहेब,श्री राजेश कुमार डाक निरीक्षक यांनी हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत मा.आमदार श्री शहाजी बापू पाटील, सांगोला विधानसभा यांना त्यांच्या चिकमहूद येथील निवासस्थानी अधिक्षक डाकघर पंढरपूर विभाग यांच्याकडून राष्ट्रीय ध्वज तिरंगा अणि पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांचे माहिती पत्रक देण्यात आले.
आदरणीय आमदार साहेबांनी पोस्टाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली.त्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक व पोस्ट ऑफिस बचत बॅंक खाते मार्फत केंद्राच्या व राज्याच्या विविध कल्याणकारी आधार संलग्न योजनांचा लाभ देशातील सर्व लाभार्थ्यांना त्यांचे खाते मध्ये देण्यात आला,याचे कौतुक केले.बरेच शेतकरी आधार सिडींग नसल्याने अनुदानापासून वंचित होते परंतु आपल्या खात्याकडे आधार सिडींग खाते वेळेवर करुन मिळतात व कोणताही शेतकरी वंचित राहत नाही या बद्दल विभागाचे विशेष कौतुक केले .
यावेळी विभागाचे विपणन अधिकारी श्री विष्णू कांदे साहेब,चिकमहूदचे पोस्टमास्तर योगेश कोळेकर,सोहम कुलकर्णी पोस्टमास्तर लोटेवाडी, अनिकेत कांबळे पोस्टमास्तर गार्डी, बाजार समितीचे संचालक विकास पवार उपस्थित होते.