कोळा विद्यामंदिर परिवारामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
कोळा (वार्ताहार) कोळा विद्यामंदिर हायस्कूल व जुनि. कॉलेज कोळा व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोर स्वातंत्र्यसेनानी परमपूज्य कै. गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य मा.वा.कोळेकर सर यांच्या शुभहस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य श्रीकांत लांडगे सर यांच्या हस्ते व सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वज फडकविण्यात आला.
त्यानंतर सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी इयत्ता दहावी व इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, रांगोळी स्पर्धा, तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा यामध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर देशभक्तीपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम प्रशाला व इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केला.
कोळा गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती सुरवंता पाटील प्राचार्य श्रीकांत लांडगे पर्यवेक्षक चारुदत्त जगताप इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक विनोद देशमुख माजी प्राचार्य पोरे सर,मा.वा. कोळेकर सर, मोहिते सर माजी पर्यवेक्षक एल वाय देशमुख सर, मणेरी सर तसेच माजी शिक्षक नरळे सर,आर एस आलदर सर, नकाते मॅडम, करांडे सर व सर्व शिक्षक- शिक्षिका- शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व पालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांना कोळा ग्रामपंचायत व ग्रामस्थ त्याचबरोबर युवा उद्योजक किरणभाऊ पांढरे, सुरेश आलदर,सोमनाथ शेटे, देवाप्पा आलदर व विजय स्पोर्टस कोळा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य श्रीकांत लांडगे सर यांनी भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास सांगितला तसेच शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील यशाचा चढता आलेख सर्वांसमोर मांडला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सरगर सर, सूत्रसंचालन मारुती सरगर सर व आभार प्रदर्शन प्रभुलिंग तेली सर यांनी केले.