वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीस प्रशालेत प्रमुख पाहुणे भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान किसन चव्हाण व संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम यांच्या शुभहस्ते व सचिव विठ्ठलपंत शिंदे सर, नीलकंठ शिंदे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. सुरुवातीस सेवानिवृत्त जवान किसन चव्हाण यांचा प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक आर एम पवार यांनी सन्मान करून जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशालेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील थोर महापुरुषांच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी देशाविषयी असणारा आदर देशभक्तीपर नृत्यातून सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त थोर क्रांती घडवणारे राष्ट्रपुरुष यांच्या विषयी विचार व्यक्त करताना आजच्या युवकांनी या थोर पुरुषांचा आदर्श विचार आत्मसात करण्याचे आव्हान केले.
या दिनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष कुंभार सर यांनी केले. ध्वजारोहणास मानवंदना सुयोग बनसोडे सर यांनी दिली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.