नॅशनल टायपिंग इन्स्टिट्यूटच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त फुले परिवारा कडून गोडसे वाडी जि.प.प्राथमिक शाळेस साउंड सिस्टम भेट
सांगोला- सांगोला शहरातील नॅशनल टाइपिंग इन्स्टिट्यूट या संस्थेचे हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे.त्या निमित्ताने जि प प्राथमिक शाळा गोडसे वाडी या शाळेस स्वातंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त साउंड सिस्टम भेट म्हणून फुले पतिवारा तर्फे प्रदान करण्यात आली.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना विलास पाटील सर यानी टाइपिंग इन्स्टिट्यूट काढण्यामागे फुले पतिवारच्या दूर दृष्टीची आठवण करुन दिली.सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इन्स्टिट्यूटने केलेल्या प्रगतीची माहिती देत फुले परिवाराच्या दातृत्वाची महती सांगून शुभेच्छा दिल्या.
प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी फुले परीवारची महती सांगताना जे जे नविन ,ते फुले परिवारने शहरात प्रथम सुरु केल्याची आठवण करुन दिली.पहिला पेट्रोल पंप,पहिली कडबा कुट्टी,पहिली पतसंस्था,पहिले टाइपिंग इन्स्टिट्यूट सुरु करण्यामागे फुले परिवाराची दूरदृष्टी व उद्योगात भरारी घेण्याची धमक असल्याचे सांगून ठोंबरे यानी त्यांच्या दातृत्वाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शाळे तर्फे रमेश फुले यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.या वेळी अच्युत फुले,प्रसाद फुले,संजय देशमाने, शाळेतील शिक्षक,शिक्षिका,ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.