मेडशिंगीचे सुपुत्र उल्हास इंगवले यांची सहाय्यक आयुक्त पदी पदोन्नती

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यातील मेडशिंगी गावचे सुपुत्र श्री.उल्हास विनायकराव इंगवले यांची महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदावर नुकतीच पदोन्नती झाली आहे. मेडशिंगीचे सुपुत्र उल्हास इंगवले यांची सहाय्यक आयुक्त पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल मेडशिंगी गावासह सांगोला तालुक्यातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.आता ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे दक्षता विभाग प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.
शांत, संयमी आणि कामाशी प्रामाणिक अशी ओळख असलेले अधिकारी म्हणून त्यांना संपूर्ण विभागात ओळखले जाते. त्यांच्याकडे आलेल्या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून ते अधिक दमदार कामगिरी करतील असा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. श्री.उल्हास इंगवले यांनी यापूर्वी नाशिक, ठाणे, पुणे व मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन अधिकारी म्हणून काम केले आहे. मा.आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ठ कार्य केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून सध्या ते काम पाहत आहेत.
एक अभिमानी, स्वाभिमानी, त्याचप्रमाणे समाजकार्याचा व्यासंग निस्वार्थ व प्रामाणिक सेवेतून जपणार्या श्री.उल्हास इंगवले यांची सहाय्यक आयुक्त पदावर पदोन्नती होताच त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



