सांगोला विद्यामंदिरमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न
१५ ऑगस्ट २०२४ अठ्ठयाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी ७८ व्या भारतीय स्वातंत्र दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्रसेनानी, देशभक्त गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास सेवानिवृत्त मुख्य लिपिक पांडुरंग बनकर, सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक पांडुरंग भुईटे यांचे हस्ते समर्पित करण्यात आला आला.
त्यानंतर प्रा. धनाजी चव्हाण यांनी स्वातंत्र लढ्यामध्यील सर्व देशभक्ताबद्दल व थोर स्वातंत्र सेनानी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्याबद्दल अतीव कृतज्ञता व्यक्त केली व स्वतंत्र भारताच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये अर्थ, उद्योग,कृषी, दळणवळण, शिक्षण, आरोग्य संशोधन,संरक्षण व क्रीडा क्षेत्रातील अभिमान वाटावे असे कार्य आहे असे सांगत एक जागरूक नागरिक म्हणून देशाप्रती असलेली आपली कर्तव्ये आपण समजून घ्यायला हवीत. तसेच आपली लोकशाही बळकट करणारी ताकद आपण टिकून ठेवली पाहिजे व देशाला विकासाच्या नव्या उंचीवरून घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला तरच आपली लोकशाही व संस्कृती जगाला अधिक दिशादर्शक ठरेल असा आशावाद व्यक्त केला.
त्यानंतर प्राचार्य अमोल गायकवाड यांनी एन.सी.सी. कॅडेटला शपथ दिली.यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर सामूहिक नृत्य सादर केले. तसेच माजी प्राचार्य संजीव नाकील, भिमाशंकर पैलवान, लक्ष्मण जांगळे,माजी उपमुख्याध्यापक सय्यद सर, माजी पर्यवेक्षक नागणे सर यांचे हस्ते विज्ञान भित्तीत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्था खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, संस्था सदस्य, माजी व विद्यमान प्राचार्य, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.ध्वजारोहन निवेदन डी.के.पाटील, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशितोष नष्टे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सुरेश मस्तुद यांनी केले.