सांगोला महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ, संचलित सांगोला महाविद्यालयात देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचेहस्ते सकाळी ठीक 8.30 वा. ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला.
यावेळी एन.सी.सी.च्या पुरूष् – महिला कॅडेटस् व उपस्थितांनी ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना देश सेवेबदद्लचा संदेश दिला.
ते पुढे म्हणाले की, अनेक स्वातंत्र्य विरांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन भारतास स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. या स्वातंत्र्याची शान राखण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. देश सवेमध्ये आपण झोकून देऊन काम केले पाहिजे असा संदेश त्यांनी दिला. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास संस्थचे उपाध्यक्ष मा.श्री.प्रा.पी.सी.झपके, सचिव मा.श्री.म.सि.झिरपे, संस्था सदस्य मा.श्री. सोमनाथ ढोले, मा.श्री.सु.ग.फुले, मा.श्री. सुधीर उकळे, माजी प्राचार्य डॉ.कृष्णा इंगोले, माजी प्राध्यापक डॉ.बी.एच.कुलकर्णी, प्रा.बी.के.लोंढे, प्रा.शिवाजीराव साळंखे, श्री. एन.एस.सुरवसे, श्री. अनिल साखरे, श्री. अशोक खडतरे, श्री. मधुकर कसबे, श्री. रमेश बुंजकर, श्री.अच्युत फुले, श्री. महेश गुरव, तसेच श्री.तानाजी गावडे (आर्मी-जवळा), श्री.तुकाराम चोपडे (आर्मी-वाकी घे.), श्री.अतुल गायकवाड (आर्मी-भोसे), श्री.रोहित लेंडवे (एसआरपीएफ-शिरभावी), श्री.आकाश कांबळे (महाराष्ट्र पोलीस-कडलास), प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डॉ.विजय गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. एन.सी.सी.कंपनी कमांडर लेफटनंट प्रा.संतोष् कांबळे, शा.शिक्षण संचालक प्रा. जगदीश चेडे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.