फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. फॅबटेक संस्थेचे चेअरमन श्री.भाऊसाहेब रुपनर यांच्या शुभहस्ते, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, फॅबटेक इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ .रवींद्र शेंडगे , फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय बैस , पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य श्री. तानाजी बुरुंगले, अकॅडमी डीन डॉ. शरद पवार, आय.क्यू.ए.सी. डीन डॉ.वाघेशा मथाडा, फॅबटेक पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यदिनानिमित्त रेवती तोडकरी, तन्मय वाघमोडे, पृथ्वीराज काळे, शौर्य हजारे , आरोही इंगोले, अस्मिता फाटे नम्रता गावडे, वेद लहुळकर, आंचल येडरावकर, शौर्य लिगाडे, श्वेता तांबे या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाची माहिती सांगितली.
यानंतर फॅबटेक पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त थोर क्रांती घडवणारे राष्ट्रपुरुष यांच्याविषयी विचार व्यक्त करताना आजच्या युवकांनी या थोर पुरुषांचा आदर्श विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे , फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल प्रोत्साहन रुपी गोष्टी विद्यार्थ्यांना सांगून आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, सामूहिक नृत्य, व मूकनाट्य सादर केले.
या दिनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कोडग यांनी केले तर आभार रेश्मा तोडकर यांनी मानले.