सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय व पूर्व प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल,सांगोला विद्यामंदिर प्राथमिक व पूर्व प्राथमिक विद्यालयात ७८वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला कै. गुरूवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला.
यानंतर संस्था खजिनदार श्री.शं.बा.सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी कार्यकारिणी सदस्य श्री. विश्वेश झपके इंग्लिश मेडिअम स्कूलच्या प्र. मुख्याध्यापिका कु. सुकेशनी नागटिळक, प्राथमिक विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक श्री. उदय बोत्रे, पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर यांच्यासह दोन्ही माध्यमाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
ध्वजारोहणासंबंधी सूचना श्री. सुभाष निंबाळकर यांनी दिल्या तर कु. दिपाली बसवदे यांनी राष्ट्रगीत, ध्वज गीत, राज्यगीताचे गायन केले.
यानिमित्ताने स्व. डॉ.भाई.गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व व रंगभरण स्पर्धेत कु.अनुश्री नागेश तेली हिने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक व रंगभरण स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला तसेच रंगभरण स्पर्धेत अनिशा अल्ताफ मुजावर तृतीय क्रमांक तर कार्तिक हरिश्चंद्र मारकड याने प्रथम क्रमांक मिळवला तसेच तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यशस्वी झालेल्या सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या मुली व मुलांच्या संघाचा व या विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे नानासाहेब घाडगे,रंगभरण स्पर्धेसाठी मेहराज मण्यार तर व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे श्री.सुभाष निंबाळकर व श्री.संतोष लवटे यांचा खजिनदार श्री.शं.बा.सावंत व कार्यकारिणी सदस्य श्री.विश्वेश झपके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर असे देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव विभाग प्रमुख कु. अनुपमा पाटणे यांच्यासह दोन्ही माध्यमातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संगमेश्वर घोंगडे यांनी केले तर शेवटी कु. लता देवळे यांनी सर्वांचे आभार मानले.