सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. या अतंर्गत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. हर घर तिरंगा अभियान अतंर्गत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. तसेच त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तिरंगा रॅलीचे सांगोला शहरात आयोजन करण्यात आले होते.
या तिरंगा रॅलीचे सांगोला शहरात उस्त्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. या वेळी सांगोला नगरपरिषदेचे कर निरीक्षक तृप्ती रसाळ , सचिन पाडे व शहर समन्वयक नवज्योत ठोकळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे नगरपरिषद परिसरात स्वागत केले. त्याठिकाणी सदर प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थ्यांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली. या तिरंगा रॅलीचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा राहुल पाटोळे ,प्रा. ऋषिकेश देशमुख व प्रा.चैतली धुमाळ यांनी केले.
हे कार्यक्रम फॅबटेकचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.