इनरव्हील क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्ष सौ स्वाती मकरंद अंकलगी यांच्या नेतृत्वाखाली कुंभार गल्ली,सांगोला येथे श्री पवन अनिरुद्ध कांबळे यांच्याकडून पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचे शिबिर आयोजित करण्यात आले होते .
या पाठीमागे इनरव्हील क्लब ऑफ सांगोलाचा उद्देश होता की, सांगोला तालुक्यातील जल प्रदूषण रोखण्यासाठी गणेश मूर्ती ह्या शाडू माती, तांबडी माती तसेच कागदाचा लगदा अशा विविध प्रकारच्या मातीपासून या मूर्ती कशा बनवाव्यात याचे प्रशिक्षण पवन कांबळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दिले. कुठल्याही प्रकारे पर्यावरणाला बाधा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचा लाभ सांगोला शहरातील 25 महिलांनी घेतला. या शिबिरासाठी क्लबच्या प्रेसिडेंट सौ स्वाती अंकलगी तसेच सेक्रेटरी सौ पल्लवी थोरात व इतर सदस्य असे मिळून 25 जण हजर होते. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सेक्रेटरी तसेच इतर सदस्यांकडून सांगोला तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती स्थापन करून नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ सांगोला कडून करण्यात आले आहे .