कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एचपी पंपावर सीएनजी पंप सेवेचे शानदार उदघाटन

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंढरपूर रोडवरील एचपी पंपावर अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असणार्या सांगोला तालुका व परिसरातील सीएनजी वाहनधारकांच्या सेवेसाठी सीएनजी पंपाचे काल मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले.उद्घाटन सोहळा सभापती समाधान पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपसभापती माणिकराव वाघमारे, बाळासाहेब काटकर, हेमंत कुमार शिंदे, रामचंद्र बाबर, विनायकराव कुलकर्णी, अमोल खरात, शोभा पवार,धनाजी पवार, आबासो आलदर, अमजद बागवान, तानाजीकाका पाटील, अरुण पाटील, विष्णू सरगर, दिपक गोडसे, किशोर शिंदे, प्रमिला चौगुले, संतोष देवकते, दगडू गावडे, पुजारी साहेब, चंद्रकांत करांडे यांच्यासह सीएनजी वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीचा सीएनजी पंप सुरू झाल्यामुळे सर्व सी.एन.जी धारकांची सोय झालेली आहे. सीएनजी च्या सिद्धतेची हमी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आलेली असून सीएनजी पेट्रोल पंपाचा तालुक्यातील सीएनजी धारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन समाधान पाटील यांनी केले आहे.