सांगोला तालुक्यातील अनेक गावात गेली अनेक वर्षा पासून टेंभू योजनेचे पाणी येत आहे भौगोलिक रचनेमुळे निंबवडे तलावतुन विठलापूर मार्गे खवासपूर – लोटेवाडी कडे येणारे पणी हे खवासपूर माणनदी बंधार्याच्या खालच्या बाजूने खाली जात आहे यामुळे गावाचा बहुतांश भाग या पाण्यापासून वंचित राहत आहे,गेली अनेक वर्षे या बंधार्यात पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरी करत होते याला यश आले नव्हते
सध्या गेल्या वर्षा पासून पुरेसा पाऊस नसल्याने येथे प्रचंड पाणी टंचाई असल्याने येथील शेतकय्रांनी निंबळकर तलाव मार्गे दिघंची बंधार्यातून खवासपूर बंधार्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती त्यानुसार डॉ. बाबासाहेब देशमुख व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी डावा कालवा या निंबळकर तलाव मार्गे खवासपूर बंधार्यात लवकरात लवकर सोडण्याच्या सुचना टेंभु चे कार्यकारी अभियंता यांना केल्या आहेत