महाराष्ट्र
जवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त सांगोला पोलीस स्टेशन यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांसाठी निर्भया पथक मार्गदर्शन.

जवळे(वार्ताहर)कै.सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. अण्णासाहेब घुले-सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे या प्रशालेत सोमवार दिनांक 4 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त सांगोला पोलीस स्टेशन सांगोला यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांसाठी निर्भया पथकाकडून मार्गदर्शन ठेवण्यात आले होते.
यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत साहेब, पोलीस कॉन्स्टेबल अमोल कुंभार, महिला पोलीस कॉन्स्टेबल कविता सावंत मॅडम, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली जोंधळे मॅडम उपस्थित होते. प्रथम विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत साहेब व पोलीस कॉन्स्टेबल अमोल कुंभार साहेब यांनी निर्भया पथक म्हणजे काय? त्याची स्थापना केव्हा झाली? व पथकाचे कार्य काय आहे? याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
मुलींनी समाजामध्ये वावरताना आपल्याकडून कोणती चूक होऊ न देता कसे निर्भयपणे वावरले पाहिजे आणि अडचणीच्या काळामध्ये कशी आणि कोणाकडून मदत मिळवली पाहिजे याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. अशावेळी निर्भया पथक नेहमीच आपल्या मदतीसाठी तयार असेल अशी ग्वाही दिली. अन्यायाच्या विरोधात आपल्या संरक्षणासाठी सरकारने अनेक कायद्यांची तरतूद केली आहे व ते कसे निर्भयपणे वापरले पाहिजेत तक्रारदार अल्पवयीन असेल तर नाव पुढे येऊ न देता ही आपल्याला तक्रार नोंदवता येते. याची माहिती दिली. तसेच मुलींसाठी महिला पोलीस कॉन्स्टेबल कविता सावंत मॅडम व महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली जोंधळे मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर उपमुख्याध्यापक श्री.संजय पौळ सर,सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.बी.डी.शिंदे सर यांनी केले