कोळा येथील डॉ पतंगराव कदम शिक्षण संस्थेला “आदर्श” संस्था पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न…

सांगोला तालुक्यातील कोळा येथील शिक्षण क्षेत्रात अल्पवधीत भरारी घेतलेल्या डॉक्टर पतंगराव कदम बहुद्देशीय शिक्षण संस्था कोळे संचलित दीपक आबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेज व बीए बीएससी महाविद्यालय या संस्थेला महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्या वतीने सोलापूर जिल्हास्तरीय शैक्षणिक व विविध सामाजिक क्षेत्रात शिक्षण संस्थेने उल्लेखनीय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आदर्श शिक्षण संस्था सन्मानचिन्ह मानपत्र देऊन संस्थेचे अध्यक्ष दीपकराव माने सचिव अमोल माने यांना सन्मान करून सत्कार करून पुरस्कार माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला या पुरस्कारामुळे संस्थेचे सर्व क्षेत्रातून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोळ्या सारख्या ग्रामीण भागात संस्थापक दीपकराव माने सचिव माने संचालक शरद माने यांची घरची हलाखीच्या गरिबीच्या खडतर परिस्थितीत नावारुपास आणली संस्था चालवताना अनेक अडचणी आल्या सर्व अनेक गोष्टीवर मात करून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी संस्था उभी राहिली या संस्थेमुळे कोळा नगरी शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात असुन शिक्षण क्षेत्रात अल्पवधीत काळामध्ये शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन एक आदर्शवत काम चालू आहे ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी एक उत्तम प्रकारे शिक्षण देण्याची चांगली सोय केली याची दखल घेत राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी संघाचे प्रदेशाध्यक्ष मुंबई मंत्रालय समन्वय समिती सदस्य बापूसाहेब आडसुळ सर यांच्या दूरदृष्टीमुळे मा आ दत्तात्रय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करून व आदर्श संस्था पुरस्कार २०२३-२४ सोलापूर जिल्हास्तरीय आदर्श संस्था पुरस्कार मिळाला आहे संस्थेच्या कार्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमास संस्थापक दिपकराव माने, सचिव अमोल माने, लोकप्रिय मा.सरपंच शहाजी हातेकर, पत्रकार जगदीश कुलकर्णी,संचालक शरद माने,युवा नेते धनाजी सरगर, माजी ग्रा,सदस्य विजय आलदर मुख्याध्यापक प्रकाश आलदर,प्रा, सोनवणे सर,विश्वनाथ पुकळे सर, अर्जुन गुरव सर, सचिन हिप्परकर सर, महेश होवाळ सर, सर्जेराव मंडले सर, निलेश मदने सर, सोहेल तांबोळी सर, विश्वास कचरे चव्हाण मॅडम,बनसोडे मॅडम,बिले मॅडम,माने मॅडम, सकट मॅडम, होवाळ मॅडम सेवक प्रथमेश हातेकर, वनिता हातेकर वंदना पोरे, यांच्यासह आदी उपस्थित होते.
आपल्या संस्थेला कृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्हास्तरीय आदर्श संस्था पुरस्कार मिळाला मनस्वी आनंद झाला या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी आता वाढली आहे सर्व शिक्षकांना नवी ऊर्जा मिळाली सर्व समितीचे मनापासून आभार मानतो..
~संस्थापक दीपकराव माने