तिप्पेहळ्ळीच्या परिवर्तन मंचचे वर्धापन दिनानिमित्त ५२ जणांचे रक्तदान…

तिप्पेहाळी सारख्या ग्रामीण भागात परिवर्तन मंचने ६ व्या वर्धापन दिनानिमित्त तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळ उत्साह निमित्त एम.एस.आय.ब्लड सेंटर, सांगली यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला यावेळी सर्व नेतेमंडळी ग्रामस्थ परिवर्तन मंचचे सदस्य उपस्थित होते.
हनुमान मंदिर तिप्पेहाळी ता सांगोला येथे ६ वा वर्धापनदिन जय तुळजाभवानी नवरात्र उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबीर विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न झाला. परिवर्तन मंचचे वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जात असतात यामध्ये अनेक वेळा गरीब विद्यार्थ्याला दत्तक घेऊन संपूर्ण शैक्षणिक खर्च मंचच्या वतीने उचलण्याचे काम करत असून समाज उपयोगी शैक्षणिक दृष्टिकोनातून परिवर्तन मंचचे युवकांचे कार्य आदर्शवत कौतुकास्पद सध्या कार्य सुरू आहे. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परिवर्तन मंचाच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.