डॉ देशमुख” यांच्या क्लिनिक मध्ये गोरगरिबांना आरोग्य सेवा चांगली मिळेल~ श्री श्री श्री रुद्रपशुपती कोळेकर महास्वामी

कोळा येथे डॉ नामदेव देशमुख यांच्या डेंटल क्लिनिकचे शानदार उद्घाटन संपन्न.
कोळ्या सारख्या ग्रामीण भागात अजनाळे गावचे प्रसिद्ध उद्योगपती सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे विष्णू मालक देशमुख यांचे बंधू १५ वर्ष डेंटल क्लिनिकचा अनुभव असलेले डॉ नामदेव देशमुख यांनी नव्याने “देशमुख” डेंटल नावाने क्लिनिक दाताचा दवाखाना या भागात पहिलाच सुरू करून गोरगरीब लोकांसाठी चांगले व कौतुकास्पद गौरवास्पद काम केले असून त्यांच्या पाठीशी आशीर्वाद कायम राहणार आहे यापुढील काळात देशमुख डॉक्टरांच्या माध्यमातून कोळा परिसरात दाताची आरोग्य सेवा चांगली मिळेल असा विश्वास कोळा नगरीचे आराध्य दैवत श्री श्री श्री रुद्रपशुपती कोळेकर महाराज यांनी व्यक्त केले.
कोळा ता सांगोला येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर देशमुख दातांचा डेंटल क्लिनिक दवाखान्याचा शुभारंभ फित कापून दाताच्या साहित्य मशिनरीचे पूजन महाराजांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सर्व नागरिक नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री श्री श्री रुद्रपशुपती कोळेकर महाराज म्हणाले डॉ देशमुख यांनी वेळ देऊन काम केले पाहिजे खऱ्या अर्थाने सांगायचे झाले तर दाताचा व माणसाचा संबंध आहेच माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्या चुकीमुळे दात खराब होतात सगळ्या गोष्टीचा विचार केला तर दाताची काळजी घेणे येणाऱ्या काळात गरजेचे महत्त्वाचे आहे आरोग्याच्या दृष्टीने आहारात बदल केला पाहिजे असे महाराजांनी शेवटी सांगितले.
यावेळी बोलताना उद्योगपती विष्णू देशमुख मालक म्हणाले कोळा परिसरातील भागातील गोरगरीब लोकांसाठी देशमुख परिवाराचा डेंटल क्लिनिक दाताचा दवाखाना सुरू करताना आनंद होत आहे सुरू करण्याचं कारण म्हणजे उपसरपंच डॉक्टर सादिक पटेल यांच्या संकल्पनेतून दवाखाना सुरू करण्याचे नियोजन केले या भागातील सर्वच डॉक्टरांनी सहकार्य करावे असा आशावाद व्यक्त करतो निमंत्रण दिल्याप्रमाणे सर्वजण ग्रामस्थ उपस्थित राहिले त्यांचे मनापासून आभार मानतो असे सांगितले.
प्रारंभी श्री श्री श्री रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांचा सन्मानपूर्वक शाल श्रीफळ फेटा देऊन माजी सरपंच विष्णू देशमुख डॉ नामदेव देशमुख शंकर देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास कोळा गावचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख ज्येष्ठ नेते तुकाराम दादा आलदर पुढारी सर, कोळा गटाचे नेते भाई गजेंद्र कोळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख,माजी सरपंच सिताराम सरगर,सरपंच पती हरी सरगर, उपसरपंच डॉक्टर सादिक पटेल, पत्रकार जगदीश कुलकर्णी, ॲड तुकाराम ढेरे, पोपट गडदे ,परमेश्वर कोळेकर, चेअरमन आप्पासाहेब सरगर, अस्तित्व संस्थेचे शहाजी गडहिरे,राजेंद्र देशमुख,ॲड धय्याप्पा आलदर,जगन्नाथ माने कुंडलिक आलदर, उत्तम तात्या आलदर बालाजी येडगे सामाजिक कार्यकर्ते समाधान बोबडे, विष्णू सरगर,प्रकाश कोळेकर,प्रशांत वलेकर,विजय माळी,डॉ कुंभार डॉ सरगर,समाजसेवक ईश्वर घाडगे, मदने, किरण पांढरे,मारुती सरगर, नितीन देशमुख ॲड निलेश मदने,उल्हास धायगुडे, गोविंद कोळेकर,धनाजी करंडे, महादेव पुजारी, सरपंच गवंड, अंबादास सरगर, डॉ सागर तेली, समाजसेवक ज्ञानेश्वर खंडागळे, दगडू सरगर, दत्तात्रय देशमुख सर, शंकर गोरड, अनिकेत पोरे अंकुश शेंबडे निलेश देशमुख आर्यन देशमुख दामोदर देशमुख अजित देशमुख नवनाथ देशमुख यांच्यासह कोळा अजनाळे ग्रामस्थ विष्णू देशमुख मित्रपरिवार कोळा परिसर व सर्व डॉक्टर्स व मेडिकल असोसिएशन मोठ्या संख्येने उपस्थित होता. मान्यवरांचे स्वागत विष्णू मालक देशमुख उत्कृष्ट सूत्रसंचालन सुभाष केंगार आभार फिरोज आतार यांनी केले.
—————————-
कोळा भागातील रुग्णांसाठी गावातील सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन गोरगरीब जनतेच्या रुग्ण सेवेसाठी श्री श्री श्री रुद्र पशुपती कोळेकर महाराज यांच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट तयार करून महाराजांना अध्यक्ष करून मिरज सांगली सांगोलाच्या धरतीवर सर्व सुविधा असलेले मोठे हॉस्पिटल काढणे गरजेचे आहे मिळून केले तर शक्य होईल येणाऱ्या काळात गरजेचे असून आमच्याकडून काय मदत लागेल सहकार्य लागेल आम्ही करण्यास तयार आहे मनोदय व्यक्त केला
~ ॲड सचिन देशमुख
माजी जिल्हा परिषद सदस्य कोळा