पुजा घोगरेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी शास्त्र शाखेत शिकणारी पूजा भारत घोगरे हिने १०० मिटर अडथळा शर्यतीमध्ये धावणे या क्रिडा प्रकारांमध्ये विभागीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेला असून तिची चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिला मार्गदर्शन महाविद्यालयाचे विठ्ठल एकमली, मनोहर बंडगर,नवनाथ मेटकरी, गिरीश चौगुले यांनी केले असून मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थिनीचे अभिनंदन श्री बाळकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भारत बंडगर,मठाधिपती बाळासाहेब महाराज,देवसागर साधक ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड यांच्यासह संस्थेचे संचालक,सभासद, विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.