फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेजने देशभक्तीपर नृत्यांमध्ये यश मिळवले. 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन साजरा करताना रोटरी क्लब व इनरव्हील क्लब सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन केले होते.
या स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता पाचवी ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. या समूह नृत्य स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी या गटामध्ये विद्यार्थ्यांनी “वंदे मातरम” हे गीत सादर केले असून व्दितीय क्रमांक मिळवला, तर इयत्ता आठवी ते दहावी या गटामध्ये “तेरी मिट्टी” हे देशभक्तीपर गीत सादर केले असून व्दितीय क्रमांक मिळवला आहे, दोन्ही गटांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पारितोषिक मिळाले. शाळेतील नृत्य शिक्षक श्री.अतिश बनसोडे यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.
शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील, ए.ओ.वर्षा कोळेकर,सुपरवायझर वनिता बाबर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अभिनंदनही केले. फॅबटेक संस्थेचे चेअरमन माननीय श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.