नाझरे ता. सांगोला येथील रहिवाशी व सध्या पुणे येथे कार्यरत असलेले माजी मुख्याध्यापक भगवान हरिबा जावीर यांचे बुधवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता अल्पशा आजाराने पिंपळे गुरव पुणे येथे निधन झाले. मृत्युप्रसंगी त्यांचे वय वर्षे 75 होते.
जावीर यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे, पाच भाऊ, पाच बहिणी असा मोठा परिवार आहे. एक आदर्श मुख्याध्यापक व होलार समाज संघटनेचे ते आधारस्तंभ होते. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी पिंपळे गुरव पुणे येथे सकाळी आठ वाजता होईल अशी नातेवाईकांनी सांगितले.