सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती जमाती(एस सी एसटी) आरक्षणाचे उपवर्गीकरण व क्रिमिलियर विरोधी असंविधानिक निर्णयाविरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने गुरुवार दि.२१ रोजी व्यापारी बंद ठेवण्यात आला. या बाबतचे बहुजन समाज पार्टीच्या वतीने तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती जमाती(एस सी एसटी) आरक्षणाचे उपवर्गीकरण व क्रिमिलियर विरोधी असंविधानिक निर्णयाविरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी बसपा सहित अनेकांनी भारत बंदचे आवाहन केले होते.
या बंदला सांगोला शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला.या संविधानिक आंदोलनात इतरांनाही सहभागी करण्यासाठी बसपाच्या राष्ट्रीय नेत्या माजी मुख्यमंत्री बहन मायावती यांच्या दिशा निर्देशानुसार बहुजन समाज पार्टीने सांगोला तालुका व शहर बंदचे आवाहन केले होते या बंदला सांगोला शहरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. बहुजन पार्टीच्या वतीने सांगोल्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले