रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने सांगोला शहरात येणाऱ्या विविध मार्गावर रोटरी क्लब सांगोला यांचे मार्फत *रोटरी स्वागत फलक* बसवण्यात आले आहेत. सांगोला येणाऱ्या नागरिकांसाठी रोटरीची माहिती होण्यासाठी रोटरी स्वागत फलक बसवण्यात आले आहेत.
याप्रसंगी रोटरी जिल्हा ३१३२ चे प्रांतपाल रो.डॉ.सुरेश साबू यांनी सांगितले की अशा बोर्डमुळे रोटरीची पब्लिक इमेज वाढते. रोटरी ची कामे लोकांपर्यंत पोहोचावी असे सांगितले. सांगोला क्लब यांनी असे विविध कार्यक्रम घेतल्याबद्दल क्लबचे अभिनंदन केले.
याप्रसंगी रोटरी क्लब सांगोल्याचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले सांगोला विभागा मध्ये रोटरी मार्फत होणाऱ्या लोक उपयोगी कामाची माहिती पब्लिक इमेज अंतर्गत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करेन.
या कार्यक्रमास रो.सौ. निर्मला साबू , सहाय्यक प्रांतपाल रो. विश्वास आराध्य, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो.सौ. सुमित्रा गादिया व सांगोला रोटरी क्लबचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.