गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी व ज्ञान भास्कर वाईकर महास्वामीजी यांची अकलूज येथे भव्य दिव्य गुरु तुला संपन्न

नाझरे प्रतिनिधी :- सद्गुरु बद्दल प्रेम, श्रद्धा ठेवून गुरु ऋणातून मुक्त व्हा व गुरुच्या मार्गाचा अवलंब करा व यासाठी इतर समाज पाच ते दहा वेळा प्रार्थना करतात परंतु आपण म्हणजे वीर शैव समाज किमान एक वेळ तरी ईस्ट लिंगाची पूजा करा व हे करीत असताना महिलांनी प्रामुख्याने घराचे परिवर्तन करायचे असेल तर स्वतःपासून लिंग पूजा करा म्हणजे पुरुषांनी करू नये असे नाही तरी आपल्या मुलांना मंदिर, मठ व गुरूच्या दर्शनासाठी घेऊन जाऊन संस्कार जपा व यासाठी मानवी मेंदूला सुरक्षित ठेवायचे असेल तर वीर शेव समाजातील प्रत्येकाने ईस्ट लिंग पूजा करणे गरजेचे आहे असे ज्ञान भास्कर वाईकर महास्वामीजी यांनी महादेव मंदिर अकलूज येथे भव्य दिव्य गुरू तुला प्रसंगी आशीर्वाचनात सांगितले. यावेळी व्यासपीठावर गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी, मार्केट कमिटी चेअरमन मदन सिंह दादा मोहिते पाटील, सां.ता.शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके, मा.जि.प. अध्यक्ष किशोर सिंह माने पाटील उपस्थित होते.

सुरुवातीस शिवैक्य कोळेकर महास्वामीजी यांच्या बद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच 31 वे पिठाधिपती गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांची पाद्यपूजा डॉक्टर शिवप्रसाद धोत्रे व डॉक्टर सुचिता धोत्रे तर ज्ञान भास्कर वाईकर महास्वामींची पाद्यपूजा चंद्रशेखर ढोले व सौ कीर्ती ढोले या उभयंताच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महास्वामींचा समाज बांधव तर्फे जयजयकार करण्यात आला तसेच दोन्ही महास्वामींची नारळ तुला करून भव्य दिव्य गुरु तुला करण्यात आली. यावेळी पुरोहित म्हणून जगदीश स्वामी व निसर्ग स्वामी यांनी काम पाहिले. तसेच शिव निर्णय संघटना, महाराष्ट्र वीरशैव सभा, वीर शैव लिंगायत महिला भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सदरचा कार्यक्रम महादेव मंदिर अकलूज येथे करण्यात आला. आज लिंगायत समाजात अनेक जण खुंटीला लिंग अडकवतात व मुलाचा पगार इतका मोठा आहे असे सांगतात परंतु पगार महत्त्वाचा नसून त्यांचा संस्कार महत्त्वाचा आहे व यासाठी सर्वांनी सदाचार वाढवा व अंतकरणाची शुद्धी करायची असेल तर ईस्टलिंग पूजा गरजेचे आहे व झपके सरांनी सांगितल्याप्रमाणे नको ते खाऊ पिऊ नका, धर्माचे पालन करा व लिंगायत समाजात प्रत्येकाला सून लिंगायत पाहिजे असे वाटते मग यासाठी आई-वडिलांनी लिंगायत सारखे वागणे गरजेचे आहे व धर्म हेच सुखी होण्याचे साधन असून यासाठी धर्म वाढवा. तसेच काहीजण सांगतात की मी दहा लाखाचे बाथरूम बांधले परंतु शेवटची अंघोळ ही बाहेरच आहे तर जन्मापासून शेवटपर्यंत ईष्ट लिंगच सोबत आहे काही बरोबर येत नाही व यासाठी त्याग करण्याची भूमिका घ्या व अध्यात्माकडे वळून निरपेक्ष जीवन जगायचे असेल तर पूजा गरजेचे आहे असा मौलिक सल्लाही गुरु ज्ञान भास्कर वाईकर महास्वामिनी यावेळी दिला.

              सदर प्रसंगी श्रावण मासानिमित्त आई-वडील पुरस्काराचे ही भव्य नियोजन करण्यात आले होते. यावेळी आदर्श आई-वडील यामध्ये सौ शकुंतला व श्री बसवेश्वर गुळवे, सौ नागिनी व श्री रेवाप्पा भदभावी, सौ कीर्ती व चंद्रशेखर शेटे, सौ हेमलता व प्रकाश डिकोळे, सौ संगीता व श्री रामलिंग सावळज कर, सौ नंदा व श्री ज्ञानदेव गवळी, सौ प्रज्ञा व श्री सदानंद गवसने, सौ जयश्री व श्री सुधाकर कुंभार, सौ सुलभा व शामराव चक्रे इत्यादी दाम्पत्यांना महास्वामींच्या समवेत व मार्केट कमिटी चेअरमन मदनसिंह मोहिते पाटील, मा. जि.प. अध्यक्ष किशोर सिंह माने पाटील व सा.ता. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्ध चंद्र झपके यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले. यावेळी समाज बांधव यामध्ये उत्कर्ष शेटे, मंगेश शेटे, अशोक शेटे, रामलिंग हांडे, उमेश गुळवे, वैभव शेटे, महादेव पाटील, शशांक गवसने, महेश डिकोळे, विजय जी मिरजे, ओम राजमाने, पत्रकार रविराज शेटे, चंद्रकांत कुंभार, मा. सरपंच महालिंग पाटील, संजय रायचुरे, रमेश शिरदाळे, योगीराज शेटे, ऋषिकेश कानडे, केदार सोनके, महिलावर्ग, समाज बांधव उपस्थित होता. सूत्रसंचालन व सर्वांचे आभार प्रा. सुहास उरवणे यांनी मानले.

————————————

कोळेकर महास्वामीजी यांचे सर्वात वेगळेपण म्हणजे ते एका समाजाचे नव्हते व प्रत्येक समाजास ते आपले च महाराज आहेत असे वाटायचे व त्यांनी सर्व जाती धर्मातील सर्वांना शिव दीक्षा दिली व त्यांच्यामुळे धर्मकारण व समाजकारण समजले, त्यांनी धार्मिक प्रसार व प्रचार तर केलाच परंतु अनेकांना व्यसनापासून दूर केले व त्यांच्या अंतदर्शनासाठी कोळेगावात लाखो लोक होते या सर्वांची चहा व बिस्किट देण्याची सोय तेथील मुस्लिम समाजाने केली व त्यामुळे हे समजले की सर्व समाज त्यांना मानत होता व त्यामुळे झाले बहु, होती ल बहु परंतु यापैकी एक कोळेकर महास्वामीजी होते.

 प्रा. प्रबुद्धचंद्र झपके
———————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button