सांगोला- सहस्त्र दर्शन सोहळा हा आयुष्यातील महत्वाचा टप्पा असुन या निमित्ताने सिंहावलोकन करताना जाधव सरांना सेवा काळातील आंबट गोड आठ्वणी आठवत असतील असे सांगून जाधव सराच्या अध्यापन,नाट्य,अभिनय या क्षेत्रातील आठ्वणी प्रेरणा देणार्या आहेत,असे गौरवोद्गार सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मन्डळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी काढले.गुरुवर्य अ.कृ. जाधव यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्यात अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते.सांगोला शहरातील हॉटेल जयनिला येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला.
गुरुवर्य जाधव यांनी सन 1968 ते 2001 पर्यंत अखंड ज्ञानदान करताना इंग्रजी,इतिहास,नागरिक शास्त्र या विषयाचे अध्यापन केले.शिक्षकांनी बसवलेल्या कवडीचुंबक नाट्कात देखिल त्यानी अभिनय केल्याची आठवण वक्त्यानी करुन दिली.या वेळी सांगोला विद्यामंदिर रीटायर्ड ग्रुपच्या वतीने जाधव सरांचा शाल बुके,भेटवस्तू व कृतज्ञता पत्र देवून गौरव करण्यात आला.
या प्रसंगी महादेव झिरपे,दिगंबर जगताप,बाळासाहेब ताकभाते,पंढरपूर येथील जीवन पाटील,पुणे येथील अडसूळ सर आदि वक्त्यानी.मनोगत व्यक्त करताना जाधव सराच्या कार्यकर्तुत्वाचा गौरव करुन शुभेच्छा दिल्या.कै.गुरुवर्य बापुसाहेब झपके यांच्या आठ्वणी सांगून स्व्तःचा जीवनपट उलगडून दाखवत जाधव सरानी कृतज्ञता व्यक्त केली.प्रा राजेंद्र ठोंबरे यानी प्रास्ताविक,भिमाशंकर पैलवान यानी सुत्रसंचालन व डॉ.अमर जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.सदर कार्यक्रमास सांगोला विद्यामंदीर परिवारातील सेवानिवृत्त सह्कारी,मित्रमन्डली,शहरातील डॉक्टर मन्डळी,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते