सांगोला:- दिनांक 26/8/2024 रोजी जि प प्रा शाळा भिमनगर सांगोला येथे मातोश्री रमाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी अंतर्गत (दंतनिदान )या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री रमाई महिला नागरिक पतसंस्थेच्या चेअरमन सौ विजयाताई बाबासाहेब बनसोडे यांच्या प्रेरणेतून झाले.
आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजसेवक बापूसाहेब ठोकळे यांना भूषविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची दातांची तपासणी सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील नामवंत डॉ. सचिन बनसोडे (दंत चिकित्सक)यांनी केली. तपासणीअंती मुलांमध्ये समरस होऊन शैक्षणिक प्रगती विषयी मुलांशी खूप छान संवाद साधला व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारे मनोगत व्यक्त केले. तसेच दातांची काळजी कशी घ्यावी, निगा राखावी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या वेळी श्री अविनाश चंदनशिवे सर, उपस्थित सर्व पालक वर्ग, प्रतिष्ठित नागरिक तसेच अंगणवाडी सेविका जयंती बनसोडे ,लक्ष्मीबाई बनसोडे सहशिक्षिका मैनाताई गायकवाड होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका शेळके मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता विजयाताई बनसोडे यांनी उपस्थित सर्वांना राजगिरा लाडू खाऊ वाटप करून छान केली.