सावे माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा.

सावे माध्यमिक विद्यालयात भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारताचे पहिले कायदामंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक श्री नलवडे सर यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अर्जुन शेळके सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना सांगितली .विद्यार्थी मनोगतात इयत्ता नववीतील कुमारी ज्योती कांबळे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली.
सदर कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री मेटकरी सर यांनी केले व आभार श्री अनुसे सर यांनी मानले.