उत्कर्ष बालक मंदिरमध्ये दहीहंडी कार्यक्रम उत्साहात संपन्न

दि. 27/ 8/ 2024 मंगळवर रोजी उत्कर्ष बालक मंदिर मध्ये दहीहंडी सोहळा साजरा करण्यात आला.
त्या सोहळ्यात काही मुली राधा तर काही मुले कृष्णाच्या वेशात तर काही गोप गोपी बनून आली होती. शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सजावट सर्व ताईंनी केली होती. सर्व मुलांचेफोटो काढण्यातआले . मुले फोटो काढण्यासाठी उत्सुक होती.कृष्ण कालियाची गोष्ट सांगितली. दहीहंडीचे महत्व मुलांना सांगितले .काही काही मुले कृष्णखोड्या करत होती.खरोखरच गोकुळातील कृष्ण शाळेत आला आहे असे वाटत होते.कृष्णाची गाणी लावून ठेवण्यात आली
होती.मुलांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला.दहीहंडी फोडून झाल्यानंतर मुलांनी व ताईंनी टिपय्रा खेळल्या.विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ.सुशिला नांगरे यांनीही बाळगोपाळांचा दहीहंडीचा कार्यक्रम पाहून त्यांचे कौतुक केले.त्यानंतर गोपाळकाल्याचा प्रसाद घेऊन बाळगोपाळ आप आपल्या घरी गेले.