सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये मंगळवार दि. 27 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणजेच गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवातीला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. सुकेशनी नागटिळक यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यालयाच्या सहशिक्षिका कु. लक्ष्मी स्वामी, मिनल पुस्तके यांनी श्रीकृष्णाची भजने सादर केली. यानिमित्ताने दहीहंडी सोहळ्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
तसेच या गोकुळाष्टमीचे औचित्य साधून विद्यालयात नर्सरी ते सिनी. केजी वर्गासाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला. यामध्ये विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले,सैनिक, डॉक्टर, शेतकरी,वकील अशा विविध वेशभूषा धारण करून आले होते. तसेच यामधून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचे संदेशही दिले.
या स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे:-वर्ग-नर्सरी एंजल1)हुसेन हुसेन मुजावर 2)आराध्या सिद्धार्थ जानकर 2)शिवन्या दादासो यादव 3)अवनी वैभव पैलवान 3)रुद्र शुभम भांगे वर्ग -ज्युनिअर केजी (गॅलेक्सी) 1) अरुश प्रसाद शेंडे 2) ईश्वरी सागर कवडे 2)शिवम अजित नवले 3) हिंदवी नाथा सरगर 3) रुद्रांश सुशांत गोरे वर्ग -ज्युनिअर केजी (रेनबो) 1) स्वरांगी सागर खुळपे 2) आर्यन धनंजय इरकर 2) कबीर परिमल अजळकर 3) शौर्य अजित धायगुडे 3) उजमा असीफ मुजावर वर्ग- सिनियर केजी (डायमंड) 1) शतदा चैतन्य कांबळे 2) आयुष प्रशांत रायचुरे 3) सम्राज्ञी समीर पाटील 3) देवांश सुजित जाधव वर्ग- सिनियर केजी (सन) 1) वेदिका विजयसिंह पाटील 2) आरोही बाळू कांबळे 3) विश्ववरया सचिन वाले 3) हार्दिक सुनील गोडसे वर्ग -सिनियर केजी (प्लॅटिनम) 1) वेदश्री सुनील फुले 2) आरव विजयकुमार सासाने 3) जिजाई नागेश केदार 3) अलिझा शहाबाज पटेल
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री. प्रबुध्दचंद्र झपके, सचिव श्री. म. शं. घोंगडे, सहसचिव श्री. प्रशुध्दचंद्र झपके, खजिनदार श्री. शं. बा. सावंत, कार्यकारिणी सदस्य श्री. विश्वेश झपके यांच्यासह सर्व संस्थासदस्य यांनी अभिनंदन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्पर्धाविभाग प्रमुख मिनल दुपडे यांच्यासह लक्ष्मी स्वामी,मिनल पुस्तके,आरिफा मुजावर,दिपाली ऐवळे,आकांक्षा भोसले यांनी परिश्रम घेतले.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कु. मिनाक्षी बिराजदार,चेतना लोखंडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनल पुस्तके,आरिफा मुजावर यांनीकेले.