सांगोला(प्रतिनिधी):-खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित, पायोनियर पब्लिक स्कूल सीबीएसई बोर्ड येथे काल दि.27 ऑगस्ट 2024 रोजी गोपाळकाला उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित अध्यक्ष पायोनियर संस्थेचे संस्थापक श्री.अनिल येलपले सर व पायोनियर पब्लिक स्कूल सीबीएसई चे प्राचार्य श्री.सतीश देवमारे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व फलक लेखन श्री.रविंद्र भारती सर यांनी केले. त्यानंतर शाळेतील काही विद्यार्थिनींनी नृत्य सादरीकरण केले. तसेच श्री.पृथ्वीराज सरवदे सर यांच्या नेतृत्त्वाखाली इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थी गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडी चा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी राधा कृष्णाची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाचे कार्य परविन तांबोळी मॅडम यांनी केले अशा प्रकारे कार्यक्रम जल्लोषात पार पाडण्यात आला.