सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, बालक मंदिर सांगोला येथे श्री कृष्णजन्म अष्टमी निमित्त वेशभूषा स्पर्धा व दहिहंडी कार्यक्रमांची सुरुवात श्री कृष्ण प्रतिमा व मुर्ती पुजन प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सौ शीलाकाकी झपके यांच्या हस्ते पुजा केली. व सर्व मुलांनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या.
वेशभूषा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी – बालवर्ग व शिशूवर्ग-1.वेदांगी विजयकुमार पाटणे प्रथम क्रमांक 2.शौर्य हारी कोरे द्वितीय क्रमांक श्री युवराज डिगोळे विभागुण द्वितीय क्रमांक 3. अमैरा आयुब मुलाणी तृतीय क्रमांक 4.सुरस्वी सिध्देश्वर माळी उत्तेजनार्थ
शिशु वर्ग:-1.वैष्णवी दत्तात्रय पवार प्रथम क्रमांक, 2.राजनंदिनी सुरेश लंबे द्वितीय क्रमांक, 3.शिवन्या ओंकार चांडोले तृतीय क्रमांक 4. शिव अमर गवळी उत्तेजनार्थ
या वेशभूषा स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून सौ गायत्री भंडारे व सौ वर्षा कोरे या उपस्थित होत्या.व तसेच मोठ्या उत्साहात सर्व बाळ गोपाळाच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली . श्रीमती अनुराधा कटरे यांनी मुलांना खाऊ वाटप केला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ सविता देशमाने मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन सौ शुभांगी गुरव मॅडम यांनी केले व कार्यक्रम उत्साहात व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला.