सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक करचे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुरुवात सूर पेटी तबला गायनाने संगीत गायनाने शाळेची सुरुवात होत आहे अशा वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण अनोख्या उपक्रमामुळे अनोखी मराठी शाळा पाहायला मिळत आहे यासाठी मुख्याध्यापक देवाप्पा काबुगडे गुरुजी सौ जयनंदा कोळेकर मॅडम यांच्या संकल्पनेने गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या योग्य नियोजनामुळे शाळा नावा रुपाला आलेली आहे सर्व परिसरातून शाळेचे कौतुक होत आहे.
डोंगर पाचेगाव परिसरात डोंगराच्या कडेला वसलेल्या करचे वस्ती जिल्हा परिषद शाळा पहिली ते चौथी पर्यंत २३ विद्यार्थी असलेले शाळा संगीतमय शिकवणारी अनोखी मराठी शाळा पुढे येत आहे शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत गिताने स्वागत केले जाते मुला मुलींना सूरपेटी तबला गायन शिकवणे मूल्यशिक्षण विद्यार्थ्यांना भाषणाची तयारी करून घेणे निबंध स्पर्धा असे अनेक प्रकारचे उत्कृष्ट शिक्षण या शाळेमध्ये देत असून शाळेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.विद्यार्थ्यांच्या आवडीचे रूपांतर त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केले तर त्यांना आनंदही मिळतो आणि शिक्षणही होते. आनंददायी शिक्षणाची संकल्पना हीच असावी हा विचार घेऊनच येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत परिपाठ घेतल्यानंतर संगीतमय स्वर पेटी हा उपक्रम हाती घेतला जातो. तो आता यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे. खर्च वस्ती जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख हेमंत बाबर विस्ताराधिकारी अमोल भंडारी शिक्षक नेते अल्लाउद्दीन तांबोळी शाळेची अभिमानस्पद शिक्षण सुरू असल्याचे सांगितले. कर्चे वस्ती ग्रामस्थांच्या लोकसहभागामुळे यामध्ये तात्यासो काबुगडे गुरुजी, संभाजी काबुगडे,संजय खरात दादासकट विजय देसाई, केशव माने प्रशांत आलदर यांनीही शाळेसाठी फार मोठे सहकार्य मदत करत आहे.
——————————————–
मुला मुलींना शाळेच्या अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना आवडीचे रूपांतर त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केले तर त्यांना आनंदही मिळतो आणि शिक्षणही होते. आनंददायी शिक्षणाची संकल्पना हीच असावी हा विचार घेऊनच करचे वस्ती जिल्हा परिषद शाळेत सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत परिपाठ घेतल्यानंतर सूर पेटी तबला गायनाने संगीतमय हा उपक्रम हाती घेतला जातो.
~ सौ दयानंद कोळेकर काबुगडे .शिक्षिका जिल्हा परिषद शाळा करचे वस्ती