सांगोला तालुक्यातील कोळा गावचे रामोशी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबाच्या मंदिरातील मूर्तीची श्री श्री श्री १००८ रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी लहान महाराज व हिंगणगावचे महादेव महाराज यांच्या शुभ हस्ते प्रतिष्ठापना सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात थाटामाटात संपन्न झाला याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होता.
कराडवाडी रोडवर कोळा गावात खंडोबा देवाचे मोठे मंदिर आहे सर्व रामोशी समाज बांधवांच्या सहकार्याने लोक वर्गणीतून खंडोबाची भव्य दिव्य मूर्ती मूर्ती बसवण्यात आली होम वाघ्या मुरळी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास तानाजीराव मोहिते, शहाजी मोहिते, युवक नेते अण्णा चव्हाण, गणेश मोहिते, युवा नेते दिनेश मोहिते, रावसाहेब मोहिते, शंकर मोहिते, शाम मोहिते, पोपट मोहिते, किरण मोहिते, सागर मोहिते, लखन मोहिते, सोमनाथ मोहिते, पंकज मोहिते, हरी मोहिते, नामदेव मोहिते, प्रकाश मोहिते, दादा मोहिते, भाऊ मोहिते, पिंटू मोहिते यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजे उमाजी तरुण मंडळ व सर्व रामोजी समाज बांधव ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले