बलवडी गावच्या नूतन तंटामुक्ती अध्यक्ष पदी मोहन भाऊ शिंदे यांची बिनविरोध निवड

बलवडी ता. सांगोला येथील नूतन तंटामुक्त अध्यक्षपदी मोहन भाऊ सुबराव राव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी सरपंच माऊली राऊत हे होते.
यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रसाद शिंदे, सरपंच माऊली राऊत, मा उपसरपंच समाधान शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सदर प्रसंगी माजी सरपंच विजय दादा शिंदे, बाळासाहेब शिंदे, युवा नेते ऍड सत्यजित लिगाडे, उपसरपंच रविराज शिंदे, ज्येष्ठ नेते साहेबराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बाबासो पालसांडे, कृष्णदेव कारंडे, शिवाजी शिंदे, विलास धायगुडे, आप्पासो पवार, सूर्यकांत शिंदे, समाधान शिंदे, आप्पासो पवार, विलास शिंदे, सर्जेराव मोहिते, शहाजी राऊत, पोपट धायगुडे, संतोष सासणे, ग्रामसेवक प्रदीप लोहार, पोलीस पाटील श्रीकांत तोरणे, नाझरे पोलीस स्टेशनचे कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विजय दादा शिंदे यांनी आभार मानले.