*नाझरे येथील रुक्मिणी चौगुले यांचे निधन

नाझरे ता. सांगोला येथील रुक्मिणी रामगौंड चौगुले यांचे बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता वर्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षे 92 होते. सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक लिंगाप्पा चौगुले, सो.जि.म. बँकेचे शाखा अधिकारी शिवदास चौगुले, प्रगतशील बागायतदार वसंतराव चौगुले व उद्योजक मधुकर चौगुले यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता नाझरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.