महाविद्यालयात मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादुगार) यांच्या 119 व्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी मेजर ध्यानचंद यांचे हॉकी व ऑलंम्पिक मधील योगदान किती अमूल्य आहे हे सांगितले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक प्रा. जे. वाय. चेडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष कांबळे यानी केले. तसेच श्री. बाबासो इंगोले व श्री. राहुल ढोले यांनी कार्यकम पार पाडण्यासाठी सहकार्य केले.