कोळा (वार्ताहर) कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनि.कॉलेजमध्ये आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ शिक्षक शब्बीर शेख सर यांच्या शुभहस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या कार्याची माहिती सांगताना मारुती सरगर सर म्हणाले, की ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी भारताला 1928,1932, 1936 मध्ये ऑलम्पिक सुवर्ण पदके मिळवून दिली. त्यांच्या नावाने केंद्र सरकार मार्फत मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार व ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार दिला जातो असा त्यांच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अथर्व आदलिंग 14 वर्षे वयोगट 41 /43 किलो प्रथम, संस्कार नरळे 19 वर्षे वयोगट 60 /64 किलो प्रथम,उमेश कारंडे 14 वर्षे वयोगट द्वितीय, कैवल्य कोरे, ओंकार सरगर, ओम माळी 17 वर्षे वयोगट द्वितीय क्रमांक, श्रीकांत नरळे,तुषार नरळे 19 वर्षे वयोगट द्वितीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांचा प्राचार्य श्रीकांत लांडगे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.यावेळी प्राचार्य श्रीकांत लांडगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सूर्योदय परिवार सांगोला यांच्यामार्फत दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रशालेतील सहशिक्षक शब्बीर शेख सर व प्रा.आनंदा आलदर सर यांना मिळाला. त्यानिमित्ताने प्राचार्य श्रीकांत लांडगे सर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व फेटा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मारुती सरगर सर यांनी केले