जि. प. प्राथ. शाळा मुजावर पिरजादेवस्ती मांजरी या शाळेत ऑगस्ट महिन्याची शिक्षण परिषद संपन्न झाली. यावेळी केंद्रप्रमुखा सौ. वैजयंती जाधव मॅडम यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. उपस्थित सर्व शिक्षकांचे पेन देऊन स्वागत करण्यात आले.
श्री युवराज मागाडे सर यांनी दिक्षा अँप वापराविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती स्वाती मेंडगुदले.मॅडम यांनी अध्ययन निष्पत्ती या विषयावर विचार मांडले. श्रीमती वर्षा बडे मॅडम यांनी शिषवृत्ती नियोजन व मार्गदर्शन या विषयावर मार्गदर्शन केले. माजी केंदप्रमुख श्री मच्छिन्द्र जगताप सर यांनी नवभारत साक्षरता याविषयी माहिती दिली.पंचायत समिती सांगोलाचे विषयतज्ञ श्री अमोल पाटोळे यांनी दिव्यांग विद्यार्थी योजना विषयी मार्गदर्शन केले.सौ जाधव मॅडम यांनी प्रशासकीय विषयांविषयी चर्चा केली.
सर्व शिक्षकांमध्ये शैक्षणिक चर्चा झाली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डिगोळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री उत्तरेश्वर बनसोडे सर यांनी केले. श्रीम श्रद्धा जिरगे मॅडम व सौ जाहेदा पिरजादे मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण परिषद संपन्न झाली
Back to top button